पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२६
Pune District Central Cooperative Bank Recruitment 2026 - Shipai Posts (289 Vacancies)
📌 महत्त्वाचे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 'शिपाई' पदाच्या २८९ रिक्त जागांसाठी पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे.
१. भरतीचा तपशील व रिक्त जागा
| पदाचे नाव | एकूण जागा | वेतन श्रेणी |
|---|---|---|
| शिपाई (Messenger / Peon) | २८९ | रु. १२,०००/- (प्रवेशिधीन कालावधी) व पुढे नियमानुसार वेतनश्रेणी |
२. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान उच्च माध्यमिक शाळांतंत परीक्षा (H.S.C. - इयत्ता १२ वी) उत्तीर्ण असावा किंवा १२ वी समकक्षा पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा: किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे (दि. ०७.०८.२०२६ पर्यंत).
- इतर अट: उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान १५ वर्षे मूळ रहिवासी असावा (सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक).
३. महत्त्वाच्या तारखा
| तपशील | दिनांक |
|---|---|
| अर्जाची सुरुवात व परीक्षा शुल्क भरणे सुरू | ०४ ऑगस्ट २०२६ (सकाळी ११:०० वा.) |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | १० ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वा.) |
| परीक्षा दिनांक / प्रवेशपत्र | बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. |
४. परीक्षा शुल्क
परीक्षेकरिता रक्कम रु. १६५०/- (अधिक १८% जी.एस.टी. व सर्व्हिस चार्ज) परीक्षा शुल्क आकारण्यात येईल. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने (UPI, Debit Card, Credit Card, Net Banking) स्वीकारले जाईल. एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
५. निवडीची कार्यपद्धती
- लेखी परीक्षा: ७० गुणांची ओ.एम.आर. (OMR) पद्धतीने वस्तुनिष्ठ परीक्षा होईल. माध्यम मराठी राहील.
- अभ्यासक्रम: शेती पतपुरवठा (२० गुण), बँकिंग व सहकार (१५ गुण), सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (१५ गुण), कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था (१० गुण), बुद्धिमत्ता चाचणी (१० गुण). एकूण ७५ मिनिटे अवधी.
- मुलाखत: कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची ३० गुणांची मुलाखत घेतली जाईल.
- "सहकारी बँकांसोबतच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पंजाब नॅशनल बँक भरती अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे."
टीप: अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सर्व अटी व पूर्तता केल्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावा.
No comments:
Post a Comment