सेक्शन कंट्रोलर पदासाठी किती दिवस बाकी आहेत?
भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRBs) CEN 03/2026 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सेक्शन कंट्रोलर (Section Controller) पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करणे फायद्याचे ठरेल.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| टप्पा / तपशील | दिनांक |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख आणि वेळ | १५ जुलै २०२६ (००:०० वाजता) |
| ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ | १४ ऑगस्ट २०२६ (२३:५९ वाजेपर्यंत) |
| फी भरण्याची अंतिम तारीख | १६ ऑगस्ट २०२६ (रविवार) |
| अर्जात बदल (Modification) करण्याची विंडो | १७ ऑगस्ट २०२६ ते २६ ऑगस्ट २०२६ |
पदाचा तपशील आणि रिक्त जागा
- पदाचे नाव: सेक्शन कंट्रोलर (Section Controller)
- एकूण रिक्त जागा: ११७ पदे (सर्व RRB मिळून)
- वेतन श्रेणी (7th CPC Level): लेव्हल ६, सुरुवातीचे मूळ वेतन ३५,४०० रुपये.
- वैद्यकीय मानक (Medical Standard): A-2 श्रेणी (सर्व प्रकारे शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त, चष्म्याशिवाय दृष्टी ६/९ इ.).
पात्रता आणि वयोमर्यादा (Educational Qualification & Age Limit)
- शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा (दिनांक ०१.०७.२०२६ नुसार): उमेदवाराचे वय २० ते ३३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. (UR/EWS साठी जन्म तारीख ०२.०७.१९९३ ते ०१.०७.२००६ दरम्यान असावी).
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/OBC-NCL/PwBD इ.) नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
परीक्षा फी (Application Fee)
- सर्वसाधारण व इतर उमेदवार: ५०० रुपये (CBT परीक्षा दिल्यानंतर बँक चार्जेस वजा करून ४०० रुपये परत केले जातील).
- महिला, आजी माजी सैनिक, SC/ST, अल्पसंख्याक आणि EBC वर्ग: २५० रुपये (CBT परीक्षा दिल्यानंतर ही पूर्ण फी परत केली जाईल).
निवड प्रक्रिया (Recruitment Process)
या भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांनुसार केली जाईल:
- सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT): या परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि लॉजिकल रीझनिंग या विषयांवर प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील (Negative Marking).
- कॉम्प्युटर बेस्ड ॲप्सिट्यूड टेस्ट (CBAT): CBT परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना CBAT परीक्षा द्यावी लागेल.
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेश आणि वैद्यकीय तपासणी (DV & Medical): CBT (७०% वेटेज) आणि CBAT (३०% वेटेज) यांच्या गुणांनुसार अंतिम मेरीट लिस्ट तयार केली जाईल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) अधिकृत वेबसाइटला (http://rrbapply.gov.in/) भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज भरताना खालील गोष्टींची काळजी घ्या:
- अर्जापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर अधिसूचना (CEN 03/2026) काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करताना स्वतःचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा.
- कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट लाइव्ह फोटो (Live Photo) कॅप्चर केला जाईल, त्यामुळे सूचनांचे पालन करावे.
- कोणतीही चूक टाळण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट न बघता वेळेत अर्ज सबमिट करा.
रेल्वे विभागातील Junior Engineer (JE) पदांच्या भरतीबद्दल माहिती हवी असल्यास RRB JE Recruitment 2026 देखील वाचा. या भरतीमध्ये 3,993 पदांसाठी संधी उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment