Tuesday, August 11, 2026

SBI Clerk Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 9,124 पदांसाठी मेगा भरती

SBI Clerk Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 9,124 पदांसाठी मेगा भरती; संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

अधिसूचना क्रमांक: CRPD/CR/2026-27/17  अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२६

बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट (Customer Support & Sales) म्हणजेच क्लर्क (Clerk) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध शाखांमध्ये हजारो जागा भरल्या जाणार आहेत.

जर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असाल, तर ही बँक नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.या लेखात आपण SBI Clerk Recruitment 2026 ची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, सविस्तर वेतनश्रेणी (Pay Scale), परीक्षेचे स्वरूप आणि अर्ज करण्याची पद्धत सविस्तर समजून घेणार आहोत.

भरतीची थोडक्यात माहिती (SBI Clerk Highlights 2026)

महत्त्वाचा तपशील माहिती
भरती संस्था स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
पदाचे नाव ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)
एकूण जागा ७,६८० (नियमित) + १,४४४ (बॅकलॉग) Total = 9124
महाराष्ट्रासाठी जागा १,७१८ नियमित जागा (स्थानिक भाषा: मराठी)
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online Application)
ऑनलाईन अर्ज मुदत ११ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६
पूर्व परीक्षा तारीख (Prelims) सप्टेंबर २०२६ (अंदाजित)
मुख्य परीक्षा तारीख (Mains) नोव्हेंबर २०२६ (अंदाजित)
अधिकृत वेबसाईट sbi.bank.in/web/careers

पात्रता निकष (Eligibility Criteria)

१. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.
  • पदवी परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबर २०२६ किंवा त्यापूर्वी घोषित झालेला असणे आवश्यक आहे.
  • पदवीच्या अंतिम वर्षात (Final Year/Semester) शिकत असलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात, परंतु निवडीच्या वेळी ३१.१२.२०२६ पूर्वी पदवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

२. वयोमर्यादा (Age Limit - ०१.०४.२०२६ रोजी)

उमेदवाराचे वय ०१ एप्रिल २०२६ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म ०२ एप्रिल १९९८ ते ०१ एप्रिल २००६ च्या दरम्यान झालेला असावा.

वयोमर्यादेतील सूट (Age Relaxation):

  • OBC (Non-Creamy Layer): ३ वर्षे
  • SC / ST: ५ वर्षे
  • PwBD (दिव्यांग उमेदवार): १० ते १५ वर्षे (प्रवर्गानुसार)
  • माजी सैनिक (Ex-Servicemen): सैन्यातील सेवा कालावधी + ३ वर्षे (जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत)

निवड प्रक्रिया आणि परीक्षा स्वरूप (Selection Process)

एसबीआय क्लर्क पदाची निवड तीन टप्प्यांत केली जाते:

टप्पा १: ऑनलाईन पूर्व परीक्षा (Preliminary Exam)

ही परीक्षा १०० गुणांची असून १ तासाचा वेळ दिला जातो. यात ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात.

विषय प्रश्नांची संख्या गुण वेळ
English Language ३० ३० २० मिनिटे
Numerical Ability (अंकगणित) ३५ ३५ २० मिनिटे
Reasoning Ability (बुद्धिमत्ता) ३५ ३५ २० मिनिटे
एकूण १०० १०० १ तास

टप्पा २: ऑनलाईन मुख्य परीक्षा (Main Exam)

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही परीक्षा २०० गुणांची असते.

विषय प्रश्नांची संख्या गुण वेळ
General/Financial Awareness ५० ५० ३५ मिनिटे
General English ४० ४० ३५ मिनिटे
Quantitative Aptitude ५० ५० ४५ मिनिटे
Reasoning Ability & Computer Aptitude ५० ६० ४५ मिनिटे
एकूण १९० २०० २ तास ४० मिनिटे

* टीप: दोन्ही परीक्षांमध्ये १/४ गुण नकारात्मक (Negative Marking) पद्धती लागू आहे.

टप्पा ३: स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test)

ज्या उमेदवारांनी १० वी किंवा १२ वीच्या गुणपत्रकावर स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) विषय म्हणून अभ्यासलेला नाही, त्यांना मुख्य परीक्षेनंतर भाषा चाचणी द्यावी लागेल.

अर्ज शुल्क (Application Fee)

ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागेल:

प्रवर्ग (Category) अर्ज शुल्क
General / OBC / EWS ₹ ७५०/-
SC / ST / PwBD / XS / DXS निःशुल्क (Nil)

SBI Clerk Vacancy 2026 Table

Circle State/UT SC ST OBC EWS GEN Total Vacancy (Regular) Backlog Vacancy
Gandhinagar Gujarat 23 49 89 33 136 330 305
Bengaluru Karnataka 121 53 205 76 305 760 39
Bhopal Madhya Pradesh 16 22 16 11 48 113 159
Bhopal Chhattisgarh 34 91 17 28 117 287 64
Bhubaneswar Odisha 176 242 132 110 440 1,100 18
Chandigarh Jammu & Kashmir UT 6 9 22 8 39 84 5
Chandigarh Himachal Pradesh 2 0 1 0 6 9 16
Chandigarh Ladakh UT 0 0 1 0 6 7 7
Chennai Tamil Nadu 267 14 380 141 608 1,410 106
Hyderabad Telangana 41 18 70 26 105 260 0
Jaipur Rajasthan 59 45 70 35 141 350 75
Kolkata West Bengal 127 27 122 55 224 555 149
Kolkata A&N Islands 0 1 4 1 9 15 10
Kolkata Sikkim 3 12 14 6 25 60 7
Lucknow Uttar Pradesh 52 2 67 25 104 250 30
Maharashtra/Mumbai Metro Maharashtra 171 154 463 171 759 1,718 281
Mumbai Metro Goa 1 7 11 6 37 62 1
Guwahati Arunachal Pradesh 0 24 0 5 26 55 17
Guwahati Assam 7 13 29 11 50 110 97
Guwahati Manipur 0 4 1 1 8 14 9
Guwahati Meghalaya 0 10 1 2 11 24 20
Guwahati Mizoram 0 14 1 3 14 32 6
Guwahati Nagaland 0 12 0 2 13 27 15
Guwahati Tripura 8 14 0 4 22 48 8
Total 1,114 837 1,716 760 3,253 7,680 1,444

अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

  1. सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: sbi.bank.in/web/careers/current-openings
  2. 'Recruitment of Junior Associates 2026' या लिंकवर क्लिक करा.
  3. 'Click for New Registration' वर जाऊन आपली प्राथमिक माहिती भरा.
  4. प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होईल.
  5. पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित प्रतिज्ञापत्र (Handwritten Declaration) अपलोड करा.
  6. आपली शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरून ऑनलाईन अर्ज शुल्क जमा करा.
  7. अंतिम सबमिशननंतर अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

सतत विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions - FAQ)

प्र.१: SBI Clerk Recruitment 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: ऑनलाईन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

प्र.२: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पदवी निकाल ३१.१२.२०२६ पूर्वी घोषित असावा.

प्र.३: महाराष्ट्रातून अर्ज करण्यासाठी मराठी भाषा अनिवार्य आहे का?

उत्तर: होय, महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारास मराठी भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.

प्र.४: SBI क्लर्क परीक्षेमध्ये नकारात्मक गुण पद्धती (Negative Marking) आहे का?

उत्तर: होय, पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५) गुण वजा केले जातात.

प्र.५: नव्याने नियुक्त झालेल्या SBI क्लर्कचा पगार किती असतो?

उत्तर: पदवीधर उमेदवारांसाठी सुरुवातीचे बेसिक पे ₹२६,७३०/- असते. महागाई भत्ता व इतर भत्त्यांसह मेट्रो शहरात सुरुवातीचा एकूण पगार सुमारे ₹४६,००० प्रतिमहिना मिळतो.

```

No comments:

Post a Comment

NIC Recruitment 2026: Scientific/Technical Assistant-A पदाची 376 पदांसाठी भरती

NIC Recruitment 2026 संदर्भात संगणक, IT, Electronics आणि Data Science क्षेत्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Natio...